-
अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच ती आपल्या फॅशनसेन्ससाठीही विशेष लोकप्रिय आहे.
-
संपूर्ण देशभरात साराची मोठी फॅन फॉलोविंग आहे. चित्रपट असो किंवा कोणतीही पोस्ट, सारा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
सारा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
नुकतेच सारा अली खानने गुलाबी साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या लुकप्रमाणेच साडीच्या किमतीनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
साडीत सारा नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने हेअरस्टाईल आणि मेकअप अतिशय साधा ठेवला आहे. साराचे एथनिक लूकमधील फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
-
साराच्या या साडीची किंमत थक्क करणारी आहे. याशिवाय तिच्या हातात दिसणारी बॅगही खूप महाग आहे. चला तर साराच्या या लुकबद्दल जाणून घेऊया.
-
सारा अली खानची ही फ्लोरल साडी तौरानी क्लोदिंग ब्रँडची आहे. या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार या साडीची किंमत ८९ हजार ५०० रुपये इतकी आहे.
-
याशिवाय साराने साडीसोबत घातलेल्या ब्लाउजची किंमत १९ हजार ५०० रुपये आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा साडीसोबत पोटली बॅग घेऊन जाताना दिसतात. साराने दिल रुबा जाना पोटली कॅरी केली आहे. या बॅगची किंमत १८ हजार ५०० रुपये इतकी सांगितली जात आहे.
-
बॅग साडी आणि ब्लाउजशी मॅचिंग आहे. याशिवाय, त्यावर एक लटकन देखील दिसत आहे. ही बॅग साराचा लूक आणखीनच आकर्षक बनवत आहे.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…