-
अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक यांनी गुपचूप साखरपुडा उरकला.
-
साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
-
या दोघांनी २०१९ मध्ये ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून पदार्पण केलं होतं.
-
तेव्हापासून ते एकमेकांसह डेटिंग करत होते, त्यानंतर मागच्या आठवड्यात एका खासगी सोहळ्यात दोघांनी साखरपुडा केला.
-
हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा पार पडला.
-
किरण व रहस्याच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
साखरपुड्यात किरणने गुलाबी कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला आहे तर रहस्या ऑलिव्ह-ग्रीन रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे.
-
साखरपुड्यात दोघेही मनसोक्त डान्स करताना दिसले.
-
(फोटो सौजन्य – किरण अब्बावरम इन्स्टाग्राम)
गाडी…बंगला…नोकरी, पैसा आणि बरंच काही; २०२६ पासून ‘या’ एका राशीचं नशिब फळफळणार, श्रीमंतीमुळे पिढ्यान पिढ्या समृद्ध होणार