-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचे चाहते त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखतात.
-
गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात एन्ट्री घेतली.
-
येत्या भागात हा मराठमोळा अभिनेता चक्क जुही चावला हिला इम्प्रेस करणार आहे.
-
जुही चावला आणि शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरव रिक्रिएट करणार आहे.
-
‘तू है मेरी किरण!’ हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
यावेळी अभिनेता जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो.
-
अभिनेत्रीवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करतो.
-
हे सगळं पाहून जुही चावला खूपच आनंदी होते.
-
गौरव मोरेच्या कॉमेडीवर व या परफॉर्मन्सवर जुही खळखळून हसत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे इन्स्टाग्राम )

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या