-
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे अभिनेत्री सई लोकूर प्रसिद्धीझोतात आली.
-
३० नोव्हेंबर २०२० मध्ये सईने तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली.
-
लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने गोंडस मुलीला जन्म दिला.
-
सई लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिच्या सासरी राहायला गेली.
-
याबाबत सईने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत याला कॅप्शन दिलं होतं, “लग्नानंतर तीन वर्षांनी मी शेवटी माझ्या सासरी चालले. मी खूप उत्साहात आहे. नवीन शहर, नवीन घर, नवीन आयुष्य.”
-
सईचं सासर बंगळुरूला आहे. लग्नानंतर सई आणि तिचा पती तीर्थदीप बंगळुरूपासून दूर राहत होते.
-
गेल्या वर्षी १० जुलैला दोघांनी बंगळुरूमध्ये नवीन घर विकत घेतलं.
-
सई दोन दिवसांपूर्वी तिच्या सासरी गेली तेव्हा सासूबाईंनी तिचं जंगी स्वागत केलं. या घरप्रवेशाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
घरी बाळाला घेऊन आल्यावर सईच्या सासूबाईंनी तिचं औक्षण केलं आणि संपूर्ण घरात अभिनेत्रीसाठी फुलांची सजावट करण्यात आली होती. (All Photos- sai.lokur/Instagram )

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…