-
कलर्स मराठीवरील सुप्रसिध्द रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
-
यंदाच्या सिझनमध्ये नवे सरप्राईज, एक्स्ट्रा धमाल, मस्ती, गॅासिप्स, मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या चार सिझननी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
अभिनेते महेश मांजरेकर यांनी पहिल्या चार सिझनचे सूत्रसंचालन केले होते.
-
महेश मांजरेकर यांना ‘बिग बॉस मराठी’ या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
-
दुसऱ्या प्रोजेक्ट्समुळे महेश मांजरेकर यंदा सूत्रसंचालन करणार नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
-
काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला.
-
‘बिग बॉस मराठी’चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : महेश मांजरेकर / इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL