-
मराठी संगीत विश्वातील लाडकी व लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे.
-
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले मुग्धा व प्रथमेश आयुष्यभराचे जीवनसाथी झाले आहेत.
-
गेल्यावर्षी २१ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले. दोघांचं मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीने लग्न झालं.
-
लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मुग्धा-प्रथमेश नेपाळ ट्रीपवर गेले आहेत.
-
इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघं नेपाळ ट्रीपचे फोटो शेअर करत आहेत.
-
तीन-चार दिवसांपूर्वी मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर कॉफी मग आणि पासपोर्टचे फोटो शेअर केले होते. ज्यावर लिहिलं होतं, “खूप गरजेचा आणि प्रतिक्षेत असलेल्या प्रवासाला जात आहोत. चला गाऊ.”
-
त्यानंतर प्रथमेशने विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या हिमालयाचा फोटो शेअर केला. पण या इन्स्टाग्राम स्टोरीमधून स्पष्ट होतं नव्हतं की, मुग्धा व प्रथमेश नेमकं कुठे फिरायला गेलेत?
-
पण ७ जूनच्या मुग्धाच्या स्टोरीवर ट्रीपच्या ठिकाणाचा खुलासा झाला
-
मुग्धाने ७ जूनला निर्सगरम्य वातावरणाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता. आजूबाजूला हिरवळ आणि हॉटेल या फोटोमध्ये पाहायला मिळालं. या फोटोवर मुग्धाने लिहिलं होतं, “हे नेपाळ”. त्या खाली ‘हयात रीजन्सी काठमांडू’ असं लोकेशन तिनं टाकलं होतं. मुग्धाच्या स्टोरीवरून दोघं नेपाळला फिरायला गेल्याचं स्पष्ट झालं.
-
त्यानंतर प्रथमेशने स्वतः काढलेले नेपाळमधील बरेच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले.
-
प्रथमेश काढलेल्या फोटोमधून तिथल्या लोकांचं राहणीमान पाहायला मिळालं.
-
शिवाय प्रथमेशच्या फोटोमध्ये नेपाळमधल्या संस्कृतीचं दर्शन झालं.
-
प्रथमेशने ट्रीपदरम्यान काढलेले सुंदर फोटो मुग्धाने देखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.
-
मुग्धा व प्रथमेशच्या नेपाळ ट्रीपचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे इन्स्टाग्राम

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल