-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एप्रिल २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले. दोघांनी २०२३ मध्ये आपली पहिली मुलगी ‘राहा’चे स्वागत केले. दोघेही बॉलीवूडमधील सुपरस्टार कलाकारांपैकी आहेत.जाणून घेऊया रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे?
-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेते आहेत. यासोबतच हे दोघेही चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकारदेखील आहेत.
-
रणबीर कपूरबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्याकडे सुमारे ३४५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, ज्यात आलिशान कार आणि मुंबईतील दोन घरांचा समावेश आहे. रणबीर कपूरने पुणे येथील कंपनी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशनमध्ये सुमारे २० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
याशिवाय रणबीर कपूरचे म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी सावनमध्येही शेअर्स आहेत. अभिनेत्याचे मुंबईतील पाली हिल येथे एक घर आहे, ज्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे पुण्याच्या ट्रम्प टॉवरमध्ये एक अपार्टमेंटदेखील आहे, ज्याची किंमत सुमारे १३ कोटी आहे.
-
रणबीर कपूर एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी रुपयांचे मानधन घेतो. याशिवाय अभिनेता अनेक कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे, जिथून तो करोडोंची कमाई करतो.
-
याशिवाय त्यांनी अनुराग बसूसोबत सुरू केलेल्या ‘पिक्चर शुरू’ प्रॉडक्शन हाऊसमध्येही त्याचा समावेश आहे. या प्रॉडक्शन हाऊसने ‘जग्गा जासूस’ आणि ‘ब्रह्मास्त्र’सारखे चित्रपट बनवले आहेत. रणबीर कपूर मुंबई सिटी एफसी फुटबॉल संघाचा सहमालकदेखील आहे.
-
आलिया भट्टबद्दल बोलायचे झाले तर ती रणबीर कपूरपेक्षा खूप श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती ५१७ कोटी रुपये आहे.
-
आलिया भट्ट एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी रुपये मानधन घेते. आलिया भट्ट ही जाहिरातींमधून कोटींची कमाई करते.
-
अभिनेत्री असण्यासोबतच आलिया भट्ट निर्मातीदेखील आहे. आलियाचं स्वतःचं ‘Eternal Sunshine’ म्हणून प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. आलियाचा ‘एड-ए-मम्मा’ नावाचा किड्स वेअर ब्रँड आहे.
-
या सर्वांशिवाय आलिया भट्टने कानपूर येथील ‘फूल’ या अगरबत्ती कंपनीतही पैसे गुंतवले आहेत. या अभिनेत्रीने २०२१ मध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी मंदिरांमध्ये अर्पण केलेली फुले गोळा करते आणि त्यापासून अगरबत्ती बनवते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Uddhav Thackeray : “पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित निवृत्ती जाहीर करतील, पण..” मोहन भागवत यांचा उल्लेख करत काय म्हणाले उद्धव ठाकरे?