-    ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि नवनिर्वाचित लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी लग्नबंधनात अडकणार आहे. 
-    सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
-    दोघेही रविवारी (२३ जून रोजी) लग्न करणार आहेत. 
-    सोनाक्षी व झहीर यांनी लग्नाआधी काही इन्स्टाग्राम स्टोरीज शेअर केल्या आहेत. यात पार्टीचे फोटो आहेत. 
-    सोनाक्षीने सोमवारी रात्री तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री हुमा कुरेशीबरोबर पार्टी केली. 
-    सोनाक्षीने तिच्या गर्ल स्क्वॉडसोबत बॅचलोरेट पार्टीचा आनंद लुटला. 
-    या पार्टीत होणारी वधू सोनाक्षी सिन्हा खूपच ग्लॅमरस दिसत होती. 
-    सोनाक्षीने तिच्या काही खास मित्र व मैत्रिणींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. 
-    दुसरीकडे सोनाक्षीचा होणारा पती झहीर इक्बाल यानेही काही फोटो शेअर केले आहेत. 
-    यात झहीर त्याच्या काही मित्रांबरोबर दिसत आहे. 
-    दरम्यान, सोनाक्षी व झहीर दोघेही मुंबईत लग्न करणार आहेत. 
-    त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. (फोटो- सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल इन्स्टाग्राम) 
 
  Pm Modi : थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू, मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय रॅली…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  