-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी फोटोशूट केलं होतं.
-
लाल रंगाचं कलमकारी डिझाइन असलेलं ब्लाऊज, त्यावर लेव्हंडर रंगाची साडी आणि केसात गुलाब असा मनमोहक लूक करून मधुराणी प्रभुलकरने तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी फोटोशूट केलं होतं. तिचं हे फोटोशूट खूप व्हायरल झाले होते.
-
पुण्याची भाजी मंडई हे मधुराणीच्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण आहे. याच ठिकाणी तिनं सुंदर फोटोशूट केलं होतं.
-
त्यानंतर नुकतंच तिनं फुल मार्केटमध्ये फोटोशूट केलं. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत.
-
सिव्हलेस ब्लाऊज, त्यावर चॉकलेटी रंगाची साडी आणि ऑक्साईड दागिने असा मनमोहक लूक मधुराणीचा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
“मी एक फुलवेडी आहेच…”, असं कॅप्शन लिहित मधुराणीने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंसह तिनं रमण रणदिवे यांची एक छानशी कविताही चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
-
फुल मार्केटमधील मधुराणीच्या फोटोमधील तिच्या मनमोहक सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
“व्वा”, “फुलराणी”, “अप्रतिम”, “क्या बात है”, “लयभारी मधुराणी”, “अप्रतिम सौंदर्यवती”, “अतिशय मनमोहक”, अशा प्रतिक्रिया मधुराणीच्या फोटोशूटवर उमटल्या आहेत.
-
अनेकांनी मधुराणीचा हा लूक ‘आई कुठे काय करते’ मालिकेत पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
-
मधुराणीच्या या सुंदर फोटोंना आतापर्यंत ११ हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत