-
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘नेत्रा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
‘नेत्रा’ला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचे वरदान दिले आहे.
-
नुकतीच तितीक्षाने तिच्या पहिल्या कमाईची आठवण चाहत्यांना सांगितली आहे.
-
प्रत्येकासाठी त्याची पहिली स्वकमाई ही खूपच खास असते.
-
तितीक्षने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.
-
तितीक्षाची पहिली कमाई (स्टायपेंड) १००० रुपये इतके होते.
-
सहा महिने स्टायपेंडची बचत करून तितीक्षाने ६००० रुपये जमा केल्यानतंर हेअर स्ट्रेट केले होते.
-
तितीक्षाचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाल्यानतंर तिने एका प्रसिद्ध फूड चेनच्या आऊटलेटमध्ये ट्रेनी म्हणून काम केले होते.
-
तेव्हा तितीक्षाचा पगार ११,५०० रुपये इतका होता.
-
पहिल्या पगारातून तितीक्षाने आई- बाबा आणि ताई (खुशबू तावडे)साठी कपडयांची खरीदी केली होती.
-
तितीक्षाला सर्वांसाठी गिफ्ट्सची खरेदी करायला खूप आवडते.
-
माझा प्रवास पाहून मी त्या काळाच्या तितीक्षाला म्हणेन की ‘काळजी करू नकोस तू छान करत आहेस. मला तुझा अभिमान आहे!’
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

Rajshree More : राजश्री मोरेची राज ठाकरेंना विनंती; “अर्धनग्न तरुणाने दारु पिऊन घातलेल्या धिंगाण्यानंतर मी घाबरले आहे, मराठी मुलीला..”