-
‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दक्षिण चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटासाठी ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारत आहेत.
-
‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात दक्षिणेमधील एका श्रीमंत कॉमेडियनही आहेत. हे कॉमेडियन सुपरस्टार कमल हासन आणि प्रभास यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.
-
या कॉमेडियनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक चित्रपट करण्यासाठी नोंदवले गेले आहे. २००७ मध्ये त्यांनी एकाच भाषेतील ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा विक्रम नोंदवला.
-
दक्षिणेचे हे सुपरस्टार दुसरे कोण नाही तर अभिनेता आणि कॉमेडियन ब्रह्मानंदम आहेत. ज्यांनी ‘कल्की 2898 एडी’मध्ये ‘राजन’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटात ते ‘भैरव’ म्हणजेच प्रभासचे जमीनदार आहेत.
-
ब्रह्मानंदम यांनी जवळपास हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मानंदम हे चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपयांचे मानधन घेतात. ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे.
-
ब्रह्मानंदम यांची मुंबई ते हैदराबादपर्यंत अनेक घरे देखील आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी किंमत आहे. यासोबतच त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”