-
‘झी मराठी’ वाहिनीवर नितीश चव्हाणची प्रमुख भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ नवी मालिका ८ जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे नवनवीन जबरदस्त प्रोमो पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. याच मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकरांचा मुलाची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.
-
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकरला लहानपणापासून अभिनय व नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयातून त्यानं बीएमएममधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. यावेळी त्यानं बऱ्याच एकांकिका, नाटकात काम केलं आहे.
-
आता अमेय नारकरच्या गर्लफ्रेंडची मराठी मालिकाविश्वात एन्ट्री होतं आहे.
-
काही महिन्यांपूर्वी अमेय व ईशाच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हिडीओत अमेयनं ईशाबरोबर ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता.
-
आता अमेयची गर्लफ्रेंड ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत झळकणार आहे.
-
या मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणींपैकी एका बहिणीच्या भूमिकेत ईशा दिसणार आहे.
-
ईशा संजयने ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे.
-
शिवाय ती भरतनाट्यम देखील शिकली आहे. तिनं अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे व्हिडीओ अमेय व अविनाश नारकरांनी लाइक केलेले पाहायला मिळत आहेत.



