-
नेहमीप्रमाणेच या वेळीही बिग बॉस ओटीटी-३ मध्ये भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. शोमध्ये सध्या यूट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे.
-
बाहेर आल्यानंतर तिने सांगितले आहे की, ज्या व्यक्तीवर तिने सर्वांत जास्त विश्वास ठेवला, त्या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला होता. त्यासोबतच तिने आपल्या पती आणि सावत्र सासऱ्यांसाठीही एक संदेश दिला आहे.
-
एका मुलाखतीत पायल मलिकने, त्या व्यक्तीचे नाव घेते तेव्हा भावूक होते, असे सांगितले. खरे तर, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून प्रसिद्ध रॅपर नाझी आहे; ज्याने पायलची फसवणूक केली.
-
जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत पायलने सांगितले की, तिला नाझीविरुद्ध राग आहे. त्याच्यासाठी मी खूप काही केले; पण त्याने मला शोमध्ये नॉमिनेट केले. मला याची अजिबात कल्पना नव्हती.
-
पुढे पायलने सांगितले की, ती नाझीला जेवणही द्यायची. त्याने मला नॉमिनेट केले नसते, तर मी शोमधून बाहेर पडले नसते.
-
दीपक चौरसिया यांनीही पायलला नॉमिनेट केले होते.
-
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना पायलने तिचा पती अरमान मलिकला सांगितले, ”ज्याला लढायचे आहे, त्याला लढू द्या. तू मात्र त्यांच्याकडे लक्ष नको देऊ.”
-
त्याच वेळी पायल क्रितीला म्हणाली की, ती सध्या जसं खेळते आहे, ते तिच्यासाठी योग्य आहे.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक