-
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय सिद्ध करणारी प्रियांका चोप्रा आज तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न बंधनात अडकल्यानंतर प्रियांका चोप्रा तिच्या पतीसोबत अमेरिकेत राहत आहे. प्रियांका कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आहे.
-
बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी सुमारे १२ कोटी रुपये मानधन घेते. त्याच वेळी, अभिनेत्री हॉलिवूड वेब सीरिजच्या एका एपिसोडसाठी सुमारे २ कोटी रुपये घेते.
-
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरूनही भरपूर कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ३ कोटी रुपये घेते. त्याचबरोबर एका जाहिरतीसाठी ती जवळपास ५ कोटी रुपये घेते.
-
अभिनेत्री असण्यासोबतच प्रियांका चोप्रा एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. प्रियंकाचा अनोमली नावाचा हेअर केअर ब्रँड देखील आहे. याशिवाय प्रियांका चोप्राचा परफेक्ट मोमेंट कपड्यांचा ब्रँड आहे आणि तिचे न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचे रेस्टॉरंटही आहे.
-
याशिवाय प्रियांका चोप्राचे पर्पल पेबल पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाऊसही आहे. एवढेच नाही तर देसी गर्लने डेटिंग ॲप बंबलमध्ये पैसेही गुंतवले आहेत.
-
प्रियांका चोप्रा अमेरिकेत राहते त्या घराची किंमत जवळपास २३८ कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीची मुंबईत दोन घरे आहेत ज्यांची किंमत प्रत्येकी ८ कोटी रुपये आहे. याशिवाय प्रियांका चोप्राची गोव्यातील बागा बीचजवळ एक मालमत्ता आहे ज्याची किंमत २० कोटी रुपये आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती ६२० कोटी रुपये आहे. अभिनेत्री दर महिन्याला सुमारे १.५ कोटी रुपये कमावते. प्रियांका चोप्राकडे कोटींचे खासगी जेट देखील आहे.
-
प्रियांका चोप्राकडे अडीच कोटी रुपयांची रोल्स रॉयस कार आहे. ही कार खरेदी करणारी प्रियांका ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. यासोबत मर्सिडीज बेंझ एस क्लास, पोर्श, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज-मेबॅच एस ६५०, ऑडी क्यू७ आणि बीएमडब्ल्यू सारख्या अनेक आलीशान गाड्या आहेत.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल