-
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून अभिनेता चेतन वडनेरे घराघरांत लोकप्रिय झाला.
-
चेतनने या मालिकेत शशांक हे पात्र साकारलं होतं.
-
मालिका संपल्यावरही त्याची लोकप्रियता कायम आहे.
-
चेतनने एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली होती.
-
लग्नानंतर बरोबर तीन महिन्यांनी नवीन घर घेत अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
चेतनचं हे नवीन घर नाशिकमध्ये आहे.
-
नव्या घराची झलक अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
“घर हे माझे आनंदाचे, दाराशी सुरेख नक्षी…नाशिकचं नवीन घर Nashik New Home” असं कॅप्शन देत चेतनने त्याच्या नव्या घराची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
चेतनच्या नव्या घराच्या दारावर लावलेली नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेते. कोणाचंही नाव न लिहिता अभिनेत्याने या नेमप्लेटवर ‘वडनेरे’ हे आडनाव लिहिलं आहे.
-
घरात प्रवेश करताच प्रशस्त असा हॉल पाहायला मिळतो.
-
अभिनेत्याच्या घरातील मॉर्डन इंटिरियरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
चेतनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रशस्त हॉल, मॉर्डन किचन, बेडरुम यांची झलक पाहायला मिळते.
-
अभिनेत्याच्या नव्या घरात सुंदर अशी बाल्कनी आहे.
-
या बाल्कनीत वारली पेटिंग काढण्यात आलं आहे.
-
चेतनच्या घरातून सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. ( सर्व फोटो सौजन्य : चेतन वडनेरे इन्स्टाग्राम )

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”