-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानचे आयुष्यही वादांनी भरलेले आहे. कधी सट्टेबाजीमुळे, कधी त्याच्या अफेअरमुळे तर कधी सलमान खानच्या अफेअरमुळे तो वादात सापडला.
-
आज आपण अभिनेता अरबाज खानच्या आयुष्यात घडलेल्या काही वादग्रस्त घटनांबाबत जाणून घेऊया.
-
घटस्फोट
अरबाज खानच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे मलायका अरोरासोबतचा घटस्फोट. दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले आणि २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. -
२०१३ मध्ये आलेल्या ‘बेशरम’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव सिंग कश्यप यांनी अरबाज खानवर आरोप केला होता की, अरबाजला त्यांचे करिअर खराब करायचे आहे. यासोबतच त्यांनी अरबाज खानवर ‘बेशरम’ चित्रपट उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता.
-
या मराठमोळ्या मॉडेलशी नाव जोडले गेले
अरबाज खानचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री उज्ज्वला राऊतसोबतही जोडले गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि उज्ज्वला राऊत यांच्यात एकदा अरबाज खानमुळे वादही झाला होता. -
अरबाज खान एकेकाळी सलमान खानमुळेही वादात सापडला होता. सुलतान चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर एका प्रश्नाच्या उत्तरात सलमान खान म्हणाला होता की, चित्रपटाचे शुटिंग खूप थकवणारे होते, त्यानंतर त्याला बलात्कार झालेल्या महिलेसारखे वाटले. अरबाज खानने सलमानच्या या वक्तव्याचे समर्थन केले. त्यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले.
-
अरबाजच्या गाडीमुळे महिलेचा मृत्यू
अरबाज खान कार अपघातांमुळेही वादात सापडला. २०१२ मध्ये, एका ७० वर्षीय महिलेचा त्याच्या लँड क्रूझर कारच्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे तो चर्चेत राहिला. महिलेच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती, जी अरबाज खानने देण्यास नकार दिला होता. -
22 वर्षांनी लहान अभिनेत्रीला केले डेट
केवळ उज्ज्वला राऊतच नाही तर अरबाज खानचे नाव त्याच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या जॉर्जिया एंड्रियानीशीही जोडले गेले आहे. मात्र, मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने मेकअप आर्टिस्ट सुरा खानसोबत लग्न केले. -
२०१८ मध्ये अरबाज खान सट्टेबाजीमुळे अडचणीत आला होता. ५ वर्षांपासून आयपीएलमध्ये सट्टा खेळत असल्याची कबुली त्याने दिली होती. (अरबाज खान/इन्स्टा)

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?