-
अभिनेत्री रश्मिका मंदानाने नुकतंच इंडिया कॉउचर वीक 2024 च्या क्लोजिंग शोसाठी फाल्गुनी शेन पीकॉकच्या रंगमहल कलेक्शनमधील पोशाख परिधान केला होता.
-
यावेळी शोस्टॉपर्स म्हणून विकी कौशलही तिच्याबरोबर दिसला. यासंबंधीचे फोटो दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
रश्मिकाने घातलेल्या भरजरी लेहेंग्यावर क्रिस्टल्सचं नक्षीकाम केलेलं असून तो विकीच्या गोल्डन टोन्ड शेरवणीला अतिशय साजेसा होता.
-
रश्मिकाने लेहेंग्यावर मिनिमल ज्वेलरी आणि ग्लॅमरस मेकअप केला होता. यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते.
-
रश्मिकाने भरजरी नक्षीकाम केलेल्या स्कर्टवर कोल्ड-शोल्डर ब्लाउज घातला होता. डाव्या खांद्यावर ओढणी घेऊन तिने लूक पूर्ण केला.
-
फॅशन लेबल फाल्गुनी शेन पीकॉकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, रंगमहाल कलेक्शन पोपट, मोर आणि राजवाडे यांसारख्या प्रतिकांच्या माध्यमातून भारतातील सांस्कृतिक वैविध्य साजरे करतो.
-
रश्मिकाच्या या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे, “तुला उगाचच नॅशनल क्रश नाही म्हणत. तू त्यासाठी अतिशय योग्य आहेस.”
-
रश्मिकाच्या कामाबाबत बोलायचे झाले तर, ती लवकरच अल्लू अर्जुन सह ‘पुष्पा 2’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
-
इतकंच नाही तर, शेखर कममुला यांचा ‘कुबेर’ आणि ए.आर. मुरुगदास यांच्या ‘सिकंदर’ या आगामी चित्रपटातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
-
‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यातील डान्ससाठी प्रशंसा मिळवणारा विकी कौशल लवकरच रश्मिका मंदानासह लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी ऐतिहासिक बायोपिक ‘छावा’मध्ये दिसणार आहे. (Photo Shoot For Falguni Shane Peacock India)

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय