-
‘स्त्री’ चित्रपटचा दूसरा भाग आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला या चित्रपटात राजकुमार राव-श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
-
सर्वत्र ‘स्त्री-२’ चित्रपटाच्या चर्चा सुरू आहेत आणि नुकतेच स्टारकास्टच्या मानधनाबाबतची माहिती देखील समोर आली आहे. या चित्रपटासाठी श्रद्धा आणि राजकुमार यांच्यासह कोणत्या कलाकारने किती मानधन घेतले ते जाणून घेऊया.
-
मीडिया रीपोर्टसनुसार, चित्रपटात राजकुमार रावने सर्वाधिक मानधन घेतले आहे. चित्रपटात अभिनेता मुख्य भूमिकेत असून त्याने निर्मात्यांकडून ६ कोटींचे मानधन घेतले आहे. -
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी ५ कोटींचे मानधन घेतले आहे. -
पंकज त्रिपाठी यांनी ‘स्त्री-२’ चित्रपटासाठी जवळपास ३ कोटी रुपये घेतले आहेत.
-
अपारशक्ती खुरानाने या चित्रपटासाठी ७० लाख रुपयांचे मानधन घेतले आहे.
-
‘स्त्री-२’ या चित्रपटाचा अभिषेक बॅनर्जीची भूमिका खूप चर्चेत आहे, अभिनेत्याने या चित्रपटासाठी ५५ रुपयांचे मानधन घेतले आहे.

Trump Tariffs: ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला मोदी सरकार ‘असं’ देणार उत्तर; घेतले तीन महत्त्वाचे निर्णय