-
अभिनेत्री रिया चक्रवर्ती बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. एका व्हिडिओमुळे सध्या रिया चर्चेचा विषय बनली आहे ज्यामध्ये ती बिझनेसमन निखिल कामथसोबत बाइक चालवताना दिसली.
-
व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघे डेट करत असल्याच्याही अनेक चर्चा रंगल्या आणि मीडिया रिपोर्ट्सवर असं सांगण्यात येतं की दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीवर अनेक आरोप करण्यात आले आणि याचा परिणाम रिया चक्रवर्तीच्या करिअरवर झाला. मात्र या नंतरही अभिनेत्री कोटींच्या मालमत्तेची मालक आहे आणि दर महिन्याला प्रचंड कमाई करते.
-
रिया चक्रवर्ती ब्रँड एंडोर्समेंटमधून चांगली कमाई करते.
-
काही वेळापूर्वी रिया चक्रवर्तीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जरी ती चित्रपटांपासून दूर असली तरी तिचे आयुष्य खूप मनोरंजक आहे. अभिनेत्रीने तिचे नवीन पॉडकास्ट चॅप्टर-२ देखील प्रदर्शित केले होते. ज्यामध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत.
-
रिया चक्रवर्तीने असा ही खुलासा केला होता की, लोक तिच्या व्यक्तिमत्त्वाचा तिरस्कार करतात आणि सोशल मीडियावरही अनेकदा ट्रॉल करतात.
-
चित्रपटांपासून दूर असली तरी ही अभिनेत्रीने एक मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहे आणि यातून ती चांगले पैसे कमावते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीची एकूण संपत्ती ११ कोटी रुपये आहे. अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३० लाख रुपयांचे मानधन घेते.
-
(सर्व फोटो: रिया चक्रवर्ती/इन्स्टाग्राम)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर