-
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.
-
सध्या अपूर्वा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सावनीची भूमिका साकारत आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
रक्षाबंधन व श्रावणी सोमवारचं औचित्य साधत अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केली आहे.
-
गाडी खरेदी करताना अपूर्वाचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
-
यावेळी नव्या गाडीची अपूर्वाने आपल्या कुटुंबासह पूजा केली.
-
नव्या गाडीची खास झलक सोशल मीडियावर शेअर करत तिने पोस्ट देखील लिहिली आहे.
-
अपूर्वा लिहिते, “रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार या शुभमुहूर्तावर आम्ही ही नवीन गाडी खरेदी केली आहे. याक्षणी मी माझ्या भावाला अन् वडिलांना प्रचंड मिस करतेय…”
-
अपूर्वाने नवीन गाडी खरेदी केल्याचे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
तसेच काही मराठी कलाकारांनी देखील अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर व PC – @ stories_by_colours_creation )

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक