-
बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. घरातील सदस्यांची बाहेरच्या जगातदेखील चांगलीच चर्चा रंगताना दिसते. ( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)
-
बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या एन्फ्लुएन्सरपैकी एक सूरज चव्हाणची सध्या चर्चा होताना दिसत आहे. ( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)
-
सूरज चव्हाणच्या खेळाविषयी अभिनेत्री आरती सोळंकीने एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे. जर सूरज न खेळता फक्त सहानुभूतीच्या आधारावर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गेला तर पुढचा सीझन मी बघणार नाही, असे तिने म्हटले आहे. ( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)
-
आरतीने म्हटले की, ज्या स्पर्धकाला हा खेळ समजला आहे. जे चांगले खेळत आहेत, तेच टॉप ३ मध्ये दिसावेत. (फोटो सौजन्य: आरती सोळंकी इन्स्टाग्राम)
-
सूरज चव्हाणला सगळे जण तो गरीब परिस्थितीतून आला आहे, या कारणामुळे पाठिंबा देतात. पण, ज्याला हा खेळ समजला, जो हा खेळ खेळणार आहे, तो जिंकावा. (फोटो सौजन्य: आरती सोळंकी इन्स्टाग्राम)
-
मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की, या शोमुळे त्याची लोकप्रियता दुप्पट व्हावी. त्याला जास्त मानधन मिळावे; पण न खेळता सूरज जिंकला नाही पाहिजे. (फोटो सौजन्य: आरती सोळंकी इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री आरती सोळंकी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. अभिनेत्रीने बिग बॉसमधील इतर सदस्यांवरदेखील भाष्य केले आहे. ( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)
-
सूरज चव्हाणला प्रेक्षकांकडून मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)
-
निक्की तांबोळीला गेम कसा खेळायचा ते माहित आहे. कारण- ती बिग बॉस हिंदीमध्ये खेळून आली आहे. कोणत्या गोष्टींमुळे ती चर्चेत राहू शकते, हे तिला माहिती आहे. (फोटो सौजन्य: आरती सोळंकी इन्स्टाग्राम)
-
महाराष्ट्रात कोणतेही योगदान नसलेल्या इरिनाला मराठी बिग बॉसमध्ये घेणे मला पटले नाही. असेही अभिनेत्रीने म्हटले आहे. (फोटो सौजन्य: आरती सोळंकी इन्स्टाग्राम)
-
भाऊचा धक्का एपिसोडमध्ये या आठवड्यात एका हिरोचा जन्म झाला असे म्हणत रितेश देशमुखने सूरज चव्हाणचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. ( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)
-
सूरज चव्हाणचा खेळ यापुढे कसा असेल पाहणे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.( फोटो सौजन्य: कलर्स मराठी)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश