-
सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘दबंग-4’ साठी चर्चेत आहे. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
चित्रपटाच्या कथेसोबतच सलमान खानचे ‘चुलबुल पांडे’ हे पात्रही चाहत्यांना खुप आवडले होते. या चित्रपटात सलमानसोबत अरबाज खानने देखील मुख्य भूमिकेत होता. चित्रपटात त्याने माखनचंद पांडे उर्फ मक्कीची भूमिका साकारली होती.
-
अलीकडेच, सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो दबंग चित्रपटाच्या पहिल्या भागाबद्दल बोलत आहे.
-
या व्हिडिओमध्ये तो चित्रपटात अरबाज खानला मारहाण करतानाच्या सीनबद्दल काही रंजक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
-
चाहत्यांना हा सीन खूप आवडला, पण हा सीन पाहून अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान संतापला होता आणि त्याने सलमान खानला मारहाण केली होती.
-
हा प्रसंग सांगताना सलमान खानने सांगितले की, अरहानने हा सीन पाहताच तो माझ्याकडे धावत आला आणि त्यानी मला मारायला सुरुवात केली.
-
अभिनेत्याने पुढे सांगितलं, “ट्रायल संपताच अरहान आला आणि रडत असताना मला मारहाण करू लागला. अरहानने मला रडत रडत बोलू लागला की, तू माझ्या वडिलांना मारलस. मग मी त्याला मिठी मारली आणि मी अरबाजला बोलावलं, अरबाजनेही त्याला मिठी मारली.”
-
“यानंतर त्याला चित्रपटाचा तो सीन दाखवण्यात आला. त्याला संपूर्ण सिक्वेल दाखवावा लागला. मग त्याला समजले की ही मारहाण नाही, तर फक्त अभिनय आहे.” दबंगबद्दलचा हा रंजक किस्सा सलमानने चाहत्यांना सांगितला.
-
(हे ही पाहा: Photos: स्त्री-२ पूर्वी ‘या’ हॉरर-कॉमेडी चित्रपटांनीही गाजवलं आहे बॉक्स ऑफिस; कोटींची कमाई करत मोडले रेकॉर्ड)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…