-
भारतातील सर्वात लोकप्रिय मालिकेत महत्वाच्या पात्रांपैकी एक भूमिका साकारण्याआधी आठ वर्षे काम नसल्यामुळे जीवनात संघर्ष करून शरद सांकला यांनी टीव्ही विश्वात मोठे नाव कमावले आहे.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत शरद सांकला यांनी अब्दुल या दुकानदाराची भूमिका केली आहे. अभिनेता अब्दुल या व्यक्तिरेखेमुळे घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेपूर्वी त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत.
-
या मालिकेआधी शरद यांनी १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुर्देश’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
-
९० च्या दशकातील विनोदी अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची नक्कल करून शरद यांनी लोकप्रियता मिळवली.
-
आपल्या अचूक अभिनयामुळे १९९० च्या दशकात शरद यांना चार्ली असे संबोधले जात होते. ‘खिलाडी’ आणि ‘बाजीगर’ या चित्रपटांमध्ये त्यांनी चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारली.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद यांना पहिल्या भूमिकेसाठी फक्त ५० रुपये मिळाले होते.
-
३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करूनही एकदा शरद यांच्या कारकिर्दीत एक असा टप्पा आला, जेव्हा त्यांना कामासाठी खुप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीत, त्यांनी खुलासा केला की ”अनेक निर्मात्यांकडे जात असूनही काम मिळत नव्हते”.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे निर्माते असित मोदी हे शरद यांचे चांगले मित्र आहेत. म्हणून मालिकेत छोट्या भूमिकेसाठी शरद यांना कास्ट केलं गेलं आणि तेव्हापासून अब्दुल हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद यांना एका एपिसोड ३५,००० ते ४५,००० रुपये घेतात. (सर्व फोटो: शरद सांकला/इन्स्टाग्राम)
