-
अभिनेत्री सखी गोखले ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
अभिनेत्रीने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे तिचा टॅटू चर्चेचा विषय ठरला आहे.
-
सखीने टॅटू म्हणून कवितेच्या काही ओळी गोंदवून घेतल्या आहेत. पण, यामागे भावुक करणारं एक खास कारण आहे.
-
दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची सखी एकुलती एक लेक आहे. वडिलांचं निधन झालं तेव्हा सखी अवघ्या ६ वर्षांची होती.
-
तिच्या वडिलांनी घराच्या दारामागे कुसुमाग्रजांच्या ओळी लिहिल्या होत्या. जेव्हा सखीच्या घराचं रिनोव्हेशन झालं तेव्हा तिच्या आईने वडिलांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळींचा तेवढा भाग जपून ठेवला.
-
सखीने त्याच ओळींचा सुंदर असा टॅटू गोंदवून घेतला आहे.
-
“ती शून्यामधली यात्रा, वाऱ्यातील एक वीराणी, गगनात विसर्जित होता, डोळ्यात कशाला पाणी” या ओळी सखीने टॅटूच्या रुपात गोंदवून घेतल्या आहेत.
-
अभिनेत्रीचा हा टॅटू सर्वांसाठीच लक्षवेधी ठरतो.
-
नेटकऱ्यांनी देखील सखीच्या या नव्या फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सखी गोखले, houseofaadyaa इन्स्टाग्राम )

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”