-
मराठमोळा लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने वयाच्या ५८व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सध्या तो अंकिता कोंवरबरोबर वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.
-
२०१८मध्ये मिलिंद सोमणने २६ वर्ष लहान असलेल्या अंकिता कोंवरबरोबर दुसरं लग्न केलं. पण मिलिंदची पहिली पत्नी कोण होती? ती सध्या काय करते? जाणून घ्या…
-
मिलिंद सोमणच्या पहिल्या पत्नीचं नाव माइलिन जम्पानोई आहे.
-
माइलिन जम्पानोई ही फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
-
मिलिंद आणि माइलिनची भेट २००५मध्ये झाली होती.
-
२००६मध्ये ‘वॅली ऑफ फ्लावर्स’च्या सेटवर मिलिंद आणि माइलिनची भेट झाली होती.
-
माइलिन ही मिलिंदपेक्षा वयाने १४ वर्षाने लहान होती.
-
तरीही मिलिंद आणि माइलिन हे दोघं पहिल्या भेटीनंतर लगेच प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
माहितीनुसार, गोव्याच्या एका रेस्टॉरंटमध्ये मिलिंद आणि माइलिनचं लग्न झालं.
-
मिलिंद आणि माइलिनचं लग्न जवळपास तीन वर्ष टिकलं आणि दोघं २००८मध्ये विभक्त झाले. २००९मध्ये मिलिंद आणि माइलिनचा घटस्फोट झाला.
-
मिलिंद सोमणबरोबर घटस्फोट झाल्यानंतर माइलिन जम्पानोई एका ग्रीक निर्माता Dimitri Stephanides बरोबर रिलेशनशिपमध्ये राहिली.
-
माइलिनने २०१४मध्ये एका मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव Andrèas Vassily आहे.
-
तसंच मिलिंद सोमणने देखील पहिल्या घटस्फोटानंतर २२ एप्रिल २०१८मध्ये अलिबाग येथे अंकिता कोंवरशी लग्नगाठ बांधली.
-
माइलिन ही एक व्हिज्युअल आर्टिस्ट देखील आहे. तिने रेखाटलेली चित्रं २०२२मध्ये Paris Galerie Sobering येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.
