-
अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि श्रेया डफळापूरकर यांच्या साखरपुड्यानंतर आता केळवणाने लग्नसराईला सुरुवात झाली आहे.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ या मालिकांमधून शाल्वने प्रसिद्धी मिळवली.
-
श्रेया डफळापूरकर ही एक स्टयलिस्ट असून ‘तालम’ या ब्रॅण्डची ती सहसंस्थापक आहे.
-
दोघांनीही त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये श्रेयाने निळ्या रंगाची सुरेख अशी डिझायनर साडी नेसली आहे.
-
ही साडी तिच्या आईच्या लग्नातली आहे असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
-
तसेच या सोहळ्यानिमित्त शाल्वने पिवळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला आहे.
-
फुल माळांच्या सजावटीमुळे शाल्व आणि श्रेयाचे हे फोटो आणखीनच बहरून आले आहेत.
-
केळवणानंतर लग्नाचा मुहूर्त ठरला असून दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
-
प्रसिद्ध कलाकार ऋतुजा बागवे आणि गौरी नलावडे यांनी कमेंट करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
(फोटो सौजन्य ; शाल्व किंजवडेकर, श्रेया डफळापूरकर/ इंस्टाग्राम)