-
‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून उंच शिखरावर पोहोचणारी प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ या चित्रपटासाठी गाणार आहे.
-
आर्या ‘हृदयात वाजे समथिंग’ , ‘बाई गं’, ‘कितीदा नव्याने’ यांसारख्या अनेक गाण्यांमधून प्रसिद्धझोतात आली आहे.
-
तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध गायक व संगीतकार ‘शंकर महादेवन’ यांच्याबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.
-
प्रसिद्ध संगीतकार ‘शंकर-एहसान-लॉय’ यांचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे.
-
या फोटोमध्ये आर्या आंबेकर चित्रपट दिग्दर्शक व प्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांच्या बरोबर दिसत आहे.
-
‘संगीत मानापमान’ या चित्रपटाचा टिझर या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षनकांच्या भेटीस आला होता.
-
या फोटोमध्ये आर्या आंबेकर संगीत वादक ‘सौमिल शृंगारपुरे’ यांच्याबरोबर दिसत आहे.
-
आर्या आंबेकरचं हे गाणं ‘जियो स्टुडिओज मराठीमध्ये’ रेकॉर्ड झालं आहे.
-
सुबोध भावे यांनी आर्याच्या या पोस्टवर ‘रेड हार्ट ईमोजी’ कमेंट केल्या आहेत.
-
‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(फोटो सौजन्य ; आर्या आंबेकर/इंस्टाग्राम आणि जिओ स्टुडिओज / यूट्यूब )
Uddhav Thackeray : मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज? एका वाक्यात दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांचा पक्ष…”