-
प्रसिद्ध अभिनेत्री व ‘रोडीज’ फेम नेहा धुपियाने ‘लाइमलाइट डायमंड्स ‘यांच्या स्टोअर लाँच इव्हेंटसाठी केलेला खास लूक सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे.
-
नेहाने २००२ साली फेमिना मिस इंडिया जिंकत पुढे अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘चुप चुपके’, ‘सिंग इस किंग’, ‘क्या कूल है हम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांतून नेहाने प्रसिद्धी मिळवली.
-
स्टोअर लाँच इव्हेंट बऱ्याच दिवसांपूर्वी झाला असून नेहाने या खास लूकचे फोटो नुकतेच शेअर केले आहेत.
-
एमटीव्ही रोडीज या कार्यक्रमाने नेहाला अधिक लोकप्रियता लाभली.
-
या खास लूकसाठी नेहाने पीच रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
नेहाचे हे फोटोशूट बाहेर असल्यामुळे सूर्याच्या प्रकाशात नेहाचा हा लूक अजूनच खुलून आला आहे.
-
या ड्रेसवर नेहाने हिऱ्याचे दागिने घातले असून, या दागिन्यांमुळे या लूकची सुंदरता उफाळून आली आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघने ‘Stunnnnnning’ अशी कमेंट करीत नेहाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य ; नेहा धुपिया / इंस्टाग्राम )

गणेश चतुर्थीनिमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र