-
‘अप्पी आमची कलेक्टर’फेम शिवानी नाईकने साडीतील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
-
या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक ही आता घराघरांत पोहोचलीय आणि लोकप्रिय झालीय.
-
अप्पीच्या पात्रात नेसलेल्या साडीमध्ये शिवानीने हे फोटो काढले आहेत.
-
शिवानीने या फोटोमध्ये तांबूस तपकिरी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीला हिरव्या व सोनेरी रंगाची सुरेख डिझाइन असलेली किनार आहे.या लूकचा मराठमोळा अंदाज दिसून येतो तो साडीवर परिधान केलेल्या सोनेरी नथीमुळे.
-
या लूकची शोभा वाढविते ते म्हणजे साडीवरचे पारंपरिक दागिने. गळ्यातील सोन्याचा दागिना, मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, सोनेरी बांगड्या व अंगठ्यांनी शिवानीचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे.
-
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अप्पीचा भाऊ दिप्या म्हणजेच आदित्य भोसले याने नवीन फोन घेतला असून, त्याचा मोबाईलमधून हे फोटो काढल्याचे सांगितले आहे.
-
म्हणून ‘आमच्या Dipya ने नवीन फोन घेतलाय म्हणून मग हौसेने फोटो काढून घेतले’ अशी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; शिवानी नाईक / इंस्टाग्राम )