-
प्रसिद्ध अभिनेत्री सानिया चौधरीने साडीतील खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘दार उघड बये’ या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिकेत सानियाने काम करत लोकांच्या मनात घर केले आहे.
-
त्यानंतर झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतही काम केले आहे.
-
याव्यतिरिक्त स्टार प्रवाह वाहिनीवरील सांग तू आहेस का या २०२० मधील मालिकेतही काम केले होते.
-
सानियाने या फोटोमध्ये तांबड्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीला निळ्या रंगाची सुरेख अशी किनार आहे.
-
साडीवर परिधान केलेल्या दागिन्यांमुळे सानियाच्या या लूकची सुंदरता उफाळून आली आहे.
-
या दागिन्यांमध्ये गळ्यातील चोकर, हातातील बांगड्या व सोनेरी कानातल्यांचा समावेश आहे. या लूकला पूर्णत्व मिळाले आहे ते सानियाच्या माथ्यावरच्या चंद्रकोरीमुळे.
-
या फोटोमध्ये सानियाने कँडिड पोज दिल्या आहेत. फोटोमधील फुलांच्या सजावटीमुळे सानियाचा लूक एक वेगळ्याच रीतीने खुलला आहे.
-
सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टवर सानियानं ‘साथिया’ हे गाणं ठेवलं आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; सानिया चौधरी /इंस्टाग्राम )