-    लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) व गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. 
-    नुकतीच त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली. 
-    शबाना आझमी व जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसतात. 
-    अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘रेडिओ नशा ऑफिशियल’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले, “माझ्या आईने मला सांगितले होते की, शायर व कवी यांच्यामध्ये अडकू नकोस. ते चांगले चांगले शब्द बोलून त्यातच फसवतील आणि मी त्यातच अडकले.” 
-    “मला माहीत नव्हते की, आमच्यामधील कोण पहिल्यांदा प्रेम व्यक्त करणार. पण, आम्हाला एकमेकांशी बोलायला आवडायचे.” 
-    “इतर कोणत्याच गोष्टी कळायच्या नाहीत. एकदा आम्ही आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. कारण- परिस्थिती कठीण होती.त्यानंतर आम्ही तीन महिने एकमेकांशी बोललोच नाही.” 
-    “एकदा शेवटचे भेटू या विचाराने आम्ही भेटलो. बाकीच्या सर्व गोष्टींबद्दल खूप बोललो आणि शेवटी आमचे नाते संपवण्याचा विचार सोडून दिला”, अशी आठवण शबाना आझमींनी सांगितली आहे.” 
-    जावेद अख्तर यांच्याबद्दल पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “ते खूप प्रामाणिक आहेत. ते त्यांच्यापेक्षाही वयाने लहान लोकांशी नम्रतेने बोलतात, हे मला खूप आवडते.” 
-    “त्यांची जी तत्त्वे आहेत तीसुद्धा मला फार आवडतात. याबरोबरच त्यांची विनोदबुद्धी व हुशारी हे गुणसुद्धा मला फार आवडतात.” 
-    “जावेद अख्तर व त्यांच्यामध्ये काय फरक आहे? यावर बोलताना त्यांनी म्हटले, “मी खूप विस्ताराने व छोट्या गोष्टींचा विचार करते आणि ते प्रत्येक गोष्टीचा मोठा विचार करतात. आम्ही जेव्हा आमचे घर बांधत होतो, त्यावेळी आमच्यात वाद झाला होता.” 
-    “मी आठवड्याच्या शेवटी आराम करण्यासाठी कॉटेजचा विचार करत होते; मात्र त्यांनी मोठे घर बांधायचे ठरवले. आम्ही या गोष्टीवरून भांडलो होतो.” 
-    “त्यावेळी त्यांच्या मित्राने मला सांगितले की, जावेदजींना एकेकाळी रस्त्यावर झोपावे लागले आहे. तीन-तीन दिवस अन्नाशिवाय उपाशी राहावे लागले आहे. हे घर बांधणे त्यांचे स्वप्न आहे. तू तुझे आयुष्य उत्तमपणे जगशील. त्यामुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करू दे.” (सर्व फोटो सौजन्य: शबाना आझमी इन्स्टाग्राम) 
 
  ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  