-
‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामधील तुळजा व सूर्या ही पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात.
-
लाखात एक आमचा दादा मालिकेत तुळजा हे पात्र अभिनेत्री दिशा परदेशी व सूर्या हे पात्र नितीश चव्हाण यांनी साकारले आहे.
-
मालिकेबरोबरच हे कलाकार सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओ यामुळे चर्चेत असतात.
-
आता अभिनेत्री दिशा परदेशीने सोशल मीडियावर नवीन वर्षानिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती कृष्णाच्या मंदिरात गेल्याचे पाहायला मिळत आहे.
-
एका फोटोमध्ये तिच्या हातात सुंदर फूलही दिसत आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने म्हटले, “कृतज्ञता आणि आशीर्वादाने माझ्या नवीन वर्षाची सुरुवात करत आहे”
-
‘लाखात एक आमचा दादा’मालिकेत सध्या तुळजा सूर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असल्याचे दिसत आहे.
-
आता तुळजा डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: दिशा परदेशी इन्स्टाग्राम)

Daily Horoscope: रेवती नक्षत्रात ‘या’ राशींच्या पदरात पडेल यश तर कोणाला ऐनवेळी घ्यावे लागतील निर्णय; वाचा तुमचे राशिभविष्य