-
प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया महेशने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
झी मराठी वाहिनीवरील पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम सुरू आहे.
-
एका बाजूला ‘पारू’ या मालिकेतील आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा पार पडणार असून ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जान्हवी आणि जयंत यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
-
या भव्य मंगल कार्यात भावना म्हणजेच अभिनेत्री अक्षया महेशने लाल रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीवर लाल रंगाचा डिझायनर ब्लाउज अक्षयाने परिधान केला आहे.
-
या साडीवरील दागिन्यांमुळे अक्षयाचे सौंदर्य उमलून आले आहे.
-
यामध्ये सोन्याचा हार, बहुरंगी हार, कानात सोन्याचे झुमके आणि हातात हिरवा चुडा यांचा समावेश आहे.
-
नाकात परिधान केलेल्या नथीमुळे अक्षयाचा हा लूक अधिक सुंदर दिसत आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अक्षयाचा हा लूक पूर्णत्वाला आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/ इंस्टाग्राम)

S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”