-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक ज्युनियर एनटीआर आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग त्याच्या १० सर्वोत्तम चित्रपटांवर एक नजर टाकूया: (Photo: Jr NTR/Instagram)
-
१. आरआरआर
ज्युनियर एनटीआरच्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे आरआरआर. या चित्रपटाला ऑस्करही मिळाला आहे. (Photo: Netflix) -
२. सिंहाद्री
ज्युनियर एनटीआरचा २००३ मध्ये आलेला सिंहाद्री हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे बजेट फक्त ८.५ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याने ५६ कोटी रुपये कमावले. (Photo: Prime Video) -
३.टेम्पर
२०१५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या टेम्पर चित्रपटानंतर हा अभिनेता एकामागून एक अॅक्शन चित्रपट करताना दिसला. चित्रपटाचे बजेट ३५ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याने सुमारे ७४ कोटी रुपये कमावले. (Photo: Sun NXT) -
४. जनता गॅरेज
ज्युनियर एनटीआरच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक म्हणजे २०१६ चा ‘जनता गॅरेज’ हा चित्रपट. या चित्रपटात मोहनलालही त्यांच्यासोबत होते. त्याचे बजेट ४० ते ५० कोटी रुपये होते आणि त्याने थिएटरमध्ये सुमारे १३५ कोटी रुपये कमावले. (Photo: Prime Video) -
५. नन्नाकू प्रेमाथो ((To Father with Lov)
आयएमडीबीनुसार, ज्युनियर एनटीआरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे नन्नकू प्रेमाथो जो २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा खूप आवडली. त्याचे बजेट ४५ ते ५० कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याने ८७ ते १३२ कोटी रुपये कमावले. (Photo: Sun NXT) -
६. यमदोंगा
यमाडोंगा हा ज्युनियर एनटीआरच्या सर्वोत्तम आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचे बजेट १६-१८ कोटी रुपये होते आणि त्याने सुमारे ३८ कोटी रुपये कमावले. (Photo: Hotstar) -
७. वृंदावनम
२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या वृंदावनम चित्रपटातील ज्युनियर एनटीआरचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटात तो काजल अग्रवाल आणि समंथा रूथ प्रभूसोबत रोमान्स करताना दिसतो. (Photo: Zee5) -
8. अरविंद समेथा वीरा राघवा
ज्युनियर एनटीआर, पूजा हेगडे आणि जगपती बाबू स्टारर चित्रपट ‘अरविंद समेथा वीरा राघवा’ ने थिएटरमध्ये 189 कोटी रुपये कमवले होते. चित्रपटाचे बजेट सुमारे ६० कोटी रुपये होते. यामध्ये ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. (Photo: Prime Video) -
९. Student No. 1
ज्युनियर एनटीआरच्या आयुष्यातील आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट जो फक्त १.८ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता आणि चित्रपटाने थिएटरमध्ये सुमारे २२ कोटी रुपये कमावले. (Photo: IMDB) -
१०. जय लव कुश (Jai Lava Kusa)
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर तिहेरी भूमिकेत दिसला होता. बजेट ४५ कोटी रुपये होते आणि कलेक्शन १५० ते १७५ कोटी रुपयांच्या दरम्यान होते. (Photo: OTTplay)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case