-
टेलिव्हिजन विश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा आपल्या स्टाइल आणि ग्रेसमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिना खानचा हा खास लूक म्हणजे भारतीय परंपरेचा आधुनिकतेशी झालेला एक अद्वितीय मिलाफ आहे. @raw_mango या नावाजलेल्या डिझायनर ब्रँडकडून खास तयार करण्यात आलेली ही जांभळी साडी म्हणजे थेट रॉयल्टीची आठवण करून देणारा एक नमुना. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
साडीवरचं सूक्ष्म आणि कलात्मक नक्षीकाम आणि तिची फॅब्रिक क्वालिटी इतकी उठून दिसते की, एक नजर टाकल्यावरही ती साडी किती खास आहे हे लक्षात येतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या साडीसोबत मोठे झुमके आणि साजेसे कडे तिच्या लूकमध्ये राजसी भव्यता आणतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचं स्टाइलिंग, अर्थातच प्रसिद्ध स्टाइलिस्ट @sayali_vidya यांचं कसब. त्यांनी हा लूक तयार करताना पारंपरिकतेला ग्लॅमरची आधुनिक किनार दिली आहे. तो नजरेत भरतो, पण तरीही अतिशय सौम्य आणि सुंदर वाटतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या लूकला पूरक असा नैसर्गिक मेकअप आणि सटल हेअरडू दिलं आहे. हिनाचा मेकअप इतका नाजूक आहे की तिचं नैसर्गिक तेज खुलून आलं आहे. तिचे उठावदार डोळे, नितळ त्वचा आणि गोड हसू तिच्या संपूर्ण लूकमध्ये एक जिवंतपणा आणतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिना खानने या पोस्टला दिलेलं कॅप्शन, “मी जरा जास्तच लाजाळू” हे जरी विनोदी आणि साधेपणाने भरलेलं असलं, तरी तिच्या फोटोंमधून दिसणारा आत्मविश्वास आणि स्टेज कमांड हे पाहता ती एक खऱ्या अर्थाने फॅशन क्वीन आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिना खानने तिच्या नव्या पोस्टला “एक नंबर तुझी कंबर, तुझी चाल Shaky” हे धमाकेदार गाणं निवडलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
खरंच, तिची चाल, ती साडीमध्ये मांडलेली अदा आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातला आत्मविश्वास अगदी ‘एक नंबर’ आहे. ही पोस्ट पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल