-
दिल्लीची रकुल प्रीत सिंग बनली टॉलीवूड ते बॉलीवूडची सुपरस्टार.
‘दे दे प्यार दे’, ‘छत्रीवाली’ यांसारखे हिट चित्रपट तिच्या अभिनय प्रवासाची साक्ष देतात. -
बॉलीवूडची स्टायलिश क्वीन रकुल प्रीत सिंग पुन्हा एकदा तिच्या बार्बी लूकमुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर गुलाबी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले असून, हे फोटो पाहून तिचे चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत.
-
तिने खास बेबी पिंक रंगाचा स्टायलिश बॅकलेस गाऊन परिधान केला होता. या लूकमध्ये तिने इन्स्टाग्रामवर विविध पोझमधले फोटो शेअर केले असून, हे फोटो पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.
-
गुलाबी बॅकलेस गाऊनसह रकुल प्रीत सिंगने साध्या कुरळ्या केसांची पोनीटेल हेअरस्टाईल निवडली, जी तिच्या लूकला परफेक्ट पूरक ठरली. मिनिमलिस्टिक मेकअप आणि एलिगंट अंदाजाने तिने चाहत्यांची मनं जिंकली..
-
गुलाबी ड्रेसवर रकुलने नैसर्गिक सौंदर्य खुलवणारा हलका मेकअप निवडला. न्यूड ग्लॉसी लिपस्टिक, सटल आयशॅडो आणि मिनिमलिस्टिक टचमुळे तिचा बार्बी स्वॅग अजूनच खुलून आला आहे.
-
रकुलने वेस्टर्न लूकसाठी लांब सोनेरी कानातले निवडले आहेत. पिंक ड्रेससोबत हा कॉन्ट्रास्ट तिच्या लूकला स्टायलिश आणि एलिगंट टच देतो.
“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…