-
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्वरी जोग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
नुकतेच शर्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले असून, त्यात तिचा नवा आणि शांत लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
-
या फोटोंमध्ये शर्वरीने सुंदर साडी परिधान केली असून, तिचं सौंदर्य आणि सहजता चाहत्यांना मोहवून टाकत आहे.
-
पुस्तक वाचताना किंवा खोल विचारात बुडालेली शर्वरी यामध्ये दिसून येते आणि तिचे हावभाव अधिकच उठून दिसत आहेत.
-
तिच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक हास्य आणि प्रसन्नता या फोटोंमधून स्पष्ट जाणवते, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू समोर येते.
-
साधेपणा, आत्मविश्वास आणि आत्ममग्नता अशा तिन्ही गोष्टींमुळे शर्वरीचा हा फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
-
फोटो शेअर होताच नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला असून, अनेकांनी ‘सुंदरी’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
अभिनयाप्रमाणेच शर्वरीचा फॅशन सेन्सही तितकाच लक्षवेधी असून, तिच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो साभार- शर्वरी जोग /इन्स्टाग्राम)
“टॉवेल, बनियानवरील माजलेल्या आमदारानं…”, संजय गायकवाड मारहाणीचे विधानपरिषदेत पडसाद