-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay) ही थरारक मालिका प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.
-
या मालिकेत दर आठवड्यला काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत.
-
प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.
-
सध्या या मालिकेत ‘लाली’ व ‘गोपाळ’च्या लग्नाची (Lali Gopal Wedding Photos) लगबग सुरू आहे.
-
अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) या मालिकेत ‘गोपाळ’ची भूमिका साकारतोय तर अभिनेत्री सोनम म्हसवेकर (Sonam Mhaswekar) ‘लाली’च्या भूमिकेत आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी ‘लाली’ने लाल रंगाची बनारसी साडी (Red Banarasi Saree) नेसली होती व भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.
-
‘गोपाळ’ने लग्नसोहळ्यासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान करत लाल फेटा बांधला होता.
-
“आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला गेला आहे. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न हे सर्व तिथेच शूट झाले आणि इतकचं नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे” असे सोनम म्हणाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती