-
मराठी कलाविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. सध्या ती ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
-
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव लावण्या ही नकरात्मक भूमिका साकारत आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी रुचिरा सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असते.
-
नुकताच (१३ जुलै) रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात केली.
-
यानंतर रुचिराने काही खास क्षण तिच्या कुटुंबियांबरोबर एन्जॉय केले. तसंच काही कामही केलं.
-
रुचिराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने हातात सूर्यफुलाचे फोटो घेत वनपीसवरील क्युट फोटो शेअर केले आहेत.
-
Birthday 2025 असं कॅप्शन देत रुचिराने हे खास फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, रुचिराच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे

मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच होणार मोठे फेरबदल? कुणाला मिळणार केंद्रात मंत्रीपद?