-
लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परबचा नवा मराठी सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असं आहे.
-
चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर दिसणार आहे.
-
यावेळी चित्रपटाच्या टीमने थेट लोकल स्टेशन गाठून प्रमोशनचा श्रीगणेशा केला.
-
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत प्रथमेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मला आठवतही नाही, मी शेवटचा लोकलने प्रवास कधी केला, पण आज प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा लोकल, प्लॅटफॉर्म हे सगळ बघून खूप भारी आणि nostalgic वाटलं”
-
त्याने पुढे लिहिलं, “मुंबई लोकल हा आमचा नवा कोरा चित्रपट १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नक्की बघा”
-
(सर्व फोटो साभार- प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाची ‘येमेन’मधील फाशी थांबवणारे ‘ग्रँड मुफ्ती’ कोण आहेत? कशी केली चर्चा?