-
२०२५ च्या एमी पुरस्कारांसाठी नामांकनं जाहीर झाली आहेत. यंदा Apple TV+ च्या ‘सेव्हरन्स’ला (Severance) ला तब्बल २७ नामांकनं मिळाली असून हा चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या चित्रपटाला जगभरातील समीक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तिन्ही आघाड्यांवर ‘सेव्हरन्स’ला पसंती मिळाली आहे.
तर, अॅपलचा विडंबनात्मक विनोदी चित्रपट ‘द स्टुडिओ’ २३ नामांकनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेथ रोजेनला दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता म्हणून नामांकने मिळाली आहेत. यासह एचबीओचा ‘द पेंग्विन’, द व्हाईट लोटस, नेटफ्लिक्सच्या ‘अडॉलोसेन्स’चाही चांगलाच बोलबाला आहे. -
सेव्हरन्स : हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाला तब्बल २७ नामांकनं मिळाली आहेत. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
द स्टुडिओ : विडंबनात्मक चित्रपट द स्टुडिओला २३ नामांकनं मिळालं आहे. अभिनेता सेथ रोजेनला या चित्रपटासाठी तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
द व्हाईट लोटस : या सिरीजचा तिसरा सीजन प्रदर्शित झाला आहे. यावेळी थायलंडमधील कथा आपल्याला पाहायला मिळाली आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
‘द पेंग्विन’ हा चित्रपट गॉथममधील अंडरवर्ल्डच्या काल्पनिक कथेवर आधारित आहे. क्रिस्टिन मिलिओटी आणि कॉलिन फॅरेलच्या या चित्रपटाला २४ नामांकनं मिळाली आहेत. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
अडॉलोसेन्स : नेटफ्लिक्सची हा सायकोलॉजिकल मिनी सिरीज प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिरीजला १३ नामांकनं मिळाली आहेत. १५ वर्षीय ओवेन कूपरने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. (छायाचित्र स्रोत: एपी)

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय