-
‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाचा नवा सीझन येत्या २६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार झळकणार सविस्तर जाणून घेऊयात…
-
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात यंदा कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. या नव्या पर्वात श्रेया बुगडे पाच गँगलॉर्ड्सपैकी एक असेल.
-
तिच्यासह लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके देखील यंदाच्या पर्वात झळकणार आहे.
-
श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे तिन्ही कलाकार यापूर्वीच्या सीझनमध्ये देखील झळकले होते.
-
यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना नव्याने ‘गौरवराज’ पाहायला मिळेल. म्हणजेच अभिनेता गौरव मोरेची ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एन्ट्री झालेली आहे.
-
यंदा ‘चला हवा येऊ द्या’मध्ये लोकप्रिय अभिनेता प्रियदर्शन जाधव देखील झळकणार आहे.
-
याशिवाय मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
-
चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने डॉ. निलेश साबळे यंदाच्या पर्वात नसेल अशी माहिती अभिनेत्याने स्वत: व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली आहे.
-
निलेश साबळेसह लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम आणि पोस्टमन काका बनून पत्र घेऊन येणारा अभिनेता सागर कारंडे हे तिघेही यंदाच्या सीझनमध्ये नसतील. दरम्यान, हा नवा सीझन २६ जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ( सर्व फोटो सौजन्य : झी मराठी वाहिनी )

नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “माझी योनी, माझे बाळ…”