-
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावतने सांगितले की, शाहरुख खानने दिलेला एक सल्ला तो आजही मनापासून जपतो. तो अनुभव त्याच्यासाठी अत्यंत मौल्यवान ठरला आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@jaideepahlawat)
-
जयदीपने शाहरुखला विचारले होते की, इतकी वर्षे लोकांचे प्रेम, ओढ आणि काही वेळा टीकाही कशी हाताळतोस? त्यावर शाहरुख म्हणाला, “मी काहीतरी वेगळं केलंय, म्हणूनच लोकांनी एवढ्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या.” (स्रोत: Instagram/@iamsrk)
-
शाहरुख पुढे म्हणाला, “जर मी काहीच वेगळं केलं नसतं, तर लोक माझ्यामागे आले नसते. त्यामुळे गोष्टी बिघडल्या, तर मी इतरांना दोष देऊ शकत नाही, ही माझीच जबाबदारी आहे.” (स्रोत: इंस्टाग्राम/@jaideepahlawat)
-
“अगदी मलाही कधी कधी लोकांवर राग येतो,” असं शाहरुख म्हणाला. “पण, मग मी स्वतःला थांबवतो. शेवटी ते ही माणसंच आहेत आणि माणसांकडून चुका होतातच.” (स्रोत: Instagram/@iamsrk)
-
कधी परिस्थिती राग आणणारी असते, निराशा येते, पण अशा वेळी दुसऱ्यांना दोष देण्याआधी स्वतःकडे पाहा, स्वतःचं वर्तन तपासा, असा सल्ला शाहरुखने दिला होता. (स्रोत: Instagram/@jaideepahlawat)
-
आपणास खटकणाऱ्या गोष्टी ओळखा, त्या टाळण्याचा मार्ग शोधा. ज्या गोष्टींमुळे समाधान मिळतं, त्यावर लक्ष केंद्रित करा. मनात कितीही राग असला तरी त्यामागेही एखादी शांतीची किनार लपलेली असते. (स्रोत: Instagram/@jaideepahlawat)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल