-
अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काल (२२ जुलै) तिने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला, ज्यात ती रडताना दिसली आणि तिने आपल्यावर ओढवलेल्या त्रासदायक अनुभवांबद्दल सांगितले. या व्हिडीओत तनुश्रीने नाना पाटेकर, महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिसांवरही आरोप करत म्हटलं की, मराठी असल्यामुळे नानांना संरक्षण दिलं जातं आणि योग्य कारवाई टाळली जाते. तिने दावा केला की तिच्या कामात अडथळे आणले गेले, सिनेमे बंद केले गेले आणि तिच्या विरोधात एक संगठित कट रचला गेला.
-
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने सांगितले की, “कालच्या व्हिडीओत गेल्या चार-पाच वर्षांचा साठलेला राग बाहेर आला. या काळात मला खूप त्रास सहन करावा लागला. तिने आरोप केला की, गुंडांकडून तिचा पाठलाग झाला, त्रास दिला गेला. २०२० पासून तिचे अनेक सिनेमे जाणीवपूर्वक थांबवले गेले. इमेल्स हॅक करून तिचं काम बंद पाडण्यात आलं. तनुश्रीने म्हटले की, एक गट तिच्या विरोधात सक्रिय आहे, तो तिचं कोणतंही काम बिघडवतो आणि लोकांच्या मनात तिच्याबद्दल नकारात्मक विचार निर्माण करून तिला एकटं पाडतो.
-
अभिनेत्री तनुश्री दत्ताने गंभीर आरोप करत सांगितले की, २०२० मध्ये तिच्या अन्नात औषध मिसळून तिला आजारी पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे ती उज्जैनला गेली, मात्र तिथेही तिच्या रिक्षाचे ब्रेक फेल करून तिचा अपघात घडवून आणल्याचा आरोप तिने केला. तिच्या मते, कोणी तरी सातत्याने तिचा पाठलाग करत होते आणि तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. यानंतर घरातही अज्ञात लोक येऊन जेवणात काहीतरी मिसळत असल्याचा धक्कादायक अनुभव तिने शेअर केला.
-
अभिनेत्री तनुश्री दत्ताने दावा केला आहे की, २०१८ नंतर तिच्यासोबत अपघात आणि त्रासदायक घटना घडू लागल्या. याआधी कधीच तिचा अपघात झाला नव्हता असं ती म्हणाली. तिने यामागे नाना पाटेकर आणि बॉलीवूडमधील माफिया गँग असल्याचा आरोप केला. “सुशांतसिंह राजपूतसोबत जे घडलं, तेच माझ्यासोबत घडतंय. फरक फक्त एवढाच की मी अजूनही जिवंत आहे,” असं तिने म्हटलं. तिने सुशांतच्या प्रकरणाचा अभ्यास केल्यामुळे आपला जीव वाचला, असं सांगत आणखी एका मुलीला अशाच प्रकारे त्रास देण्यात आल्याचा उल्लेखही केला. या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी तिने भगवद्गीतेतील कृष्णाचा संदेश पाळला. ती म्हणाली, “मी कृष्ण भक्त आहे. आजूबाजूला महाभारत सुरू असलं, तरी मला सरळ मार्गानेच चालायचं आहे.
-
तिच्या मते, इथे मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलिस आणि मंत्री त्याला पाठीशी घालतात, त्यामुळे त्याचा इगो आणि हिंमत दोन्ही वाढली आणि मला संपवण्याचा कट रचला गेला.
-
तनुश्री दत्ताने सांगितले की, “नाना पाटेकर हे मोठे अभिनेता नाही. २००८ मध्ये त्यांच्याकडे काहीही नव्हतं, फोटोसुद्धा नव्हते.”
ती म्हणाली, तेव्हा मी मोठी अभिनेत्री होते, माझं नाव होतं. निर्माते मला विनवत होते की मी सिनेमात काम करावं, कारण त्यामुळेच तो विकला जाईल. तनुश्रीने आरोप केला की, माझ्यासोबत वाद निर्माण करून ते पुढे गेले आहेत. इंडस्ट्रीत कोणी त्यांच्यासोबत कामही करायला तयार नव्हतं. (सर्व फोटो सौजन्य : तनुश्री दत्ता/ इंस्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…