-
सध्या ‘सैयारा’ (Saiyaara movie) सिनेमाने प्रेक्षकांची मनं चांगलीच जिंकली आहेत असं दिसतंय.
-
मोहित सुरी दिग्दर्शित (Mohit Suri) व अहान पांडे (Ahaan panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) अभिनीत हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
दरम्यान चित्रपटातली अभिनेत्री अनित पड्डाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
तिचा हा पहिलाच चित्रपट (First Movie) रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे. तसेच, प्रेक्षकांना तिचा अभिनय (Acting) खूप आवडतो आहे.
-
२२ वर्षीय अनित पड्डा रियल लाइफमध्येही खूप बोल्ड (bold) असल्याचे तिच्या या फोटोंवरुन लक्षात येते.
-
‘सैयारा’ हा अनितचा पहिला बॉलिवूड चित्रपट मानला जात असला तरी, याआधीही तिने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky)) चित्रपटात काजोलसोबत (Kajol) स्क्रीन शेअर केली आहे. यामध्ये तिने एक छोटीशी भूमिका केली होती.
-
अनितने २०२४ मध्ये ओटीटीवरही पदार्पण केले आहे. अनित अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ (Big Girls Dont Cry) या वेब सिरीजमध्ये दिसली होती.
-
अनित सोशल मीडियावरदेखील (Social Media) खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे नवे फोटो (New photos) शेअर करत राहते.
-
अनितने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार दिसून येतोय. दरम्यान, ‘सैयारा’नंतर तिचे फोटो जास्त व्हायरल होत आहेत. तसेच तिचे फॉलोअर्सही (Followers) वाढत आहेत. (सर्व फोटो साभार- अनित पड्डा इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं निसर्गरम्य ठिकाणी मोहक फोटोशूट; फोटो पाहिलेत का?

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय