-
हिंदी चित्रपटसृष्टीत शेकडो चित्रपट येऊन गेले आहेत. यापैकी अनेक चित्रपटांमध्ये ‘पाऊस’ महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आज याच बाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातला पहिला चित्रपट आहे सत्या. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस आणि इन्स्टाग्राम)
-
सत्या या चित्रपटात मनोज वाजपेयी, चक्रवर्ती, गोविंद नामदेव, शेफाली छाया, परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्या हा एक कल्ट चित्रपट आहे. मुंबईतल्या गँगवॉरवर तो भाष्य करतो. यातले ६० टक्के प्रसंग पावसातले आहेत.
-
सत्या नंतरचा आणखी एक चित्रपट म्हणजे कंपनी. या चित्रपटातला एक प्रसंग जेव्हा मलिक (अजय देवगण) त्याच्या शत्रूला ठार करतो तो पावसातलाच आहे. पावसामुळे या प्रसंगाचं गहिरेपण वाढलं आहे.
-
आमिर खान आणि राणी मुखर्जीचा गुलाम हा चित्रपटही पावसाशिवाय अधुरा आहे. यातलं आँखो से तुने ये क्या कह दिया? हे गाणंही प्रसिद्ध आहे.
-
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा रावन हा चित्रपटही पावसातल्या प्रसंगांशिवाय अपूर्ण आहे. यातही अनेक प्रसंग पावसातले आहेत. जे कथाभाग पुढे नेताता.
-
रावन हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. पावसातली साहस दृश्य हा चित्रपटातील चर्चेचा विषय ठरला होता.
-
काजोल आणि आमिर खानच्या फना सिनेमातही पावसातले प्रसंग आहेत. खासकरुन यातलं गाणं ये साजिश है बुंदो की.. ते अजूनही लोकांच्या ओठांवर अनेकदा रुंजी घालतं.
-
जब वी मेट हा शाहिद आणि करीना यांचा सिनेमाही चांगलाच चर्चेत राहिला होता. यातलं पावसातलं गाणं ना है ये पाना.. ना खोना भी है.. हे चांगलंच चर्चेत राहिलं.
-
सैफ आणि दीपिकाचा लव्ह आज कल हा चित्रपटही पावसातल्या प्रसंगांशिवाय अधुराच आहे.
-
शाहरुख काजोलचा कुछ कुछ होता है चित्रपटातील पावसातला रोमान्स आणि खास डान्स लोकांच्या स्मरणात आहे.
-
राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांचा हम तुम या चित्रपटातली पावसातले प्रसंग आहे. यातलं टायटल साँगही पावसातच शूट झालं आहे. (फोटो सौजन्य-यशराज स्टुडिओज)
-
लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटात ज्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत त्यातही मुंबईतला पाऊस उत्तम प्रकारे कथा पुढे नेण्यात यशस्वी ठरतो.
-
बाते कुछ अनकहींसी हे गाणं असो किंवा कोंकणाचं शिल्पा शेट्टीशी फोनवर बोलणं असो पाऊसही मुख्य भूमिकेत आहेच.
-
तुंबाड हा चित्रपट तर पावसाशिवाय अधुराच आहे. कारण या चित्रपटात तसा संवादही आहेच. देवता ओ का शाप तुंबाड पर बारीश बन कर बरस रहा है.
-
तुंबाड सिनेमा अनेक दिव्य प्रसंगांतून पुढे जात शूट झाला आहे. त्यातलं सर्वात मोठं दिव्य पाऊस पडणारं ठिकाण शोधणं होतं. सततचा पाऊस हा चित्रपटाचा प्रमुख धागा आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.
-
आशिकी 2 या चित्रपटातही पाऊस उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आला आहे. यात काहीच शंका नाही.

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”