-
सध्या सिनेप्रेमींमध्ये साऊथ स्टार विजय देवरकोंडाच्या किंगडम चित्रपटाची उत्सुकता खूप वाढली आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
-
ट्रेलरमधून चित्रपटाबद्दलची ओढ आणखीनच वाढते आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी, ३१ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
-
दरम्यान, निर्माते व अभिनेत्यांकडून चित्रपटाचे प्रमोशन सुरु करण्यात आलेले आहे.
-
नुकतंच ‘किंगडम बॉइज’ या नावाने एक पॉडकास्ट यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
-
यामध्ये चित्रपटातील तुरुंगातील चित्रिकरण हे २०० वर्षे जुन्या तुरूंगात करण्यात आल्याचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी यांनी सांगितलं आहे.
-
फिल्ममेकर संदीप रेड्डी वांगा या पॉडकास्टमध्ये विजय व गौतम यांना प्रश्न विचारताना दिसून येत आहे.
-
गौतम यांनी सांगितलं की तुरूंगातील दृष्यांचे चित्रिकरण श्रीलंकेतील कँडी या शहरातील २०० वर्षे जुन्या तुरूंगात करण्यात आले आहे.
-
त्यांनी सांगितलं की “तो जेल आता बंद आहे, त्याजागी हॉटेलचं बांधकाम सुरू आहे. कँडी एक हिल स्टेशन असून त्याठिकाणी भरपूर पाऊस पडतो.” विजयने सांगितले की “पावसामुळे तिथे शूट करताना प्रचंड मेहनत करावी लागली.” तसेच त्याचमुळे सीन खूप छान तयार झाले असं दोघांनी सांगितलं. (Photos Source: Trailer Screenshots) हेही पाहा- आता UPI व्यवहारांवर लागणार शुल्क? आरबीआय गव्हर्नरांनी दिले संकेत; १ ऑगस्टपासून दोन महत्वाचे बदल…

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत