-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी ही मालिका आणि मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
मालिकेतील एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक खास बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री कौमुदी वलोकरने नुकतीच स्वत:ची कंपनी सुरू केली आहे.
-
याबद्दल ती म्हणते, “इथवरच्या छोट्या-जेमतेम केलेल्या आयुष्याच्या प्रवासात, असंच पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण होताना दिसतंय; मागच्या आठवड्यात स्वतःची कंपनी काढली.”
-
“मला क्रिकेटर व्हायचं होतं, त्यासाठी शिकतही होते. मग डॉक्टर व्हावं असं वाटू लागलं. पण अभिनयाची ओढ निर्माण झाली आणि शाळेत असल्यापासून बराचसा वेळ हा त्यासाठी द्यायला लागले.”
-
“आयुष्यात मानसशस्त्र आलं. हा विषय आला की, सगळ्यांनाच मनातून काहीतरी होतं. त्यात पदव्युत्तर शिक्षण केल्यावर हे सगळं आपल्यालाच तर होत नाही ना, असे अगदीच वाटून गेलं.”
-
“खरंतर आपण रोज छानच असतो, छान वाटतंही असतं; पण कधीतरी असं वाटतं ना – कोणी तरी असावं, जे मनाला आणि विचारांना, सरळ, सोप्पं करायला मदत करतील.”
-
“कुणालाच गरज पडावी अशी इच्छा नाही, पण गरज सांगून येत नाही आणि गरज पडलीच तर मी आणि माझी टीम तुमच्याबरोबर उभे राहायला तयार आहोत.”
-
दरम्यान, आरोहीने सुरू केलेल्या तिच्या या कंपनीचं नाव ‘PsychEd’ असं आहे. याद्वारे लोकांना मानसिक आरोग्यांबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. (फोटो सौजन्य : कौमुदी वलोकर इन्स्टाग्राम)
-
कौमुदीने आपल्या पतीसह ही कंपनी सुरू केली आहे. कौमुदी आणि तिचा नवरा आकाश चौकसे हे दोघे या कंपनीचे संस्थापक आहेत. याबद्दलची माहिती तिच्या ‘PsychEd’ कंपनीच्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे देण्यात आली आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत