-
लहानपणीच अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळविणारी आणि सन ऑफ सरदार २ मधून मोठ्या पडद्यावर आलेल्या अभिनेत्री रोशनी वालियानं आपल्या जीवनातील काही आठवणी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितल्या आहेत. (Photo – Roshni Walia Instagram)
-
या पॉडकास्टमध्ये तिनं तिच्या आईबद्दल भरभरून सांगितलं. तसंच आईनं केलेला त्याग, समर्पणामुळंच आपल्याला लढण्याचं बळ मिळालं आणि यशाचा मार्ग दिसला, असंही रोशनीनं म्हटलं. (Photo – Roshni Walia Instagram)
-
मी आज जे काही आहे, ते माझ्या आईमुळंच आहे, असं रोशनी म्हणाली. आईनं तिचं घर माझ्यासाठी सोडलं आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला, मला सांभाळायला ती माझ्यासह मुंबईला आली. तिच्याशिवाय मी आज इथवर पोहोचलेच नसते. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनीनं पुढं म्हटलं की, माझ्या आयुष्यातला बराच काळ मी टेलिव्हिजन आणि चित्रपटाच्या सेटवर काढला. तिथे वयानं मोठ्या असणाऱ्या कलाकारांची साथ लाभली, त्यामुळे मी लवकर परिपक्व झाले. आयुष्याकडं पाहण्याचा माझा दृष्टीकोनही बदलला. तसंच सिनेसृष्टीतील राजकारणही मला लवकर कळू लागलं. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनीनं आईबद्दल बोलताना सांगितलं की, मी आयुष्यात मोठी होऊ शकले, त्याचे पूर्ण श्रेय आईचं आहे. तिनं मला जगण्याचं स्वातंत्र्यही दिलं आणि मार्गदर्शनही केलं. तिच्या नियमांचं मला कधी बंधन वाटलं नाही. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनीनं आपल्या आईबद्दल मोकळेपणानं जे काही मांडलं, त्यावर आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेकांनी तिच्या मताशी सहमती दर्शविली आहे. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनीच्या शब्दातून तिच्या आईच्या विचारांमधील स्पष्टता, उदारता दिसून येते. “माझी आई मला नेहमी काळजी घेण्याबाबत सांगायची. माझ्या बहिणीलाही ती हेच सांगत होती. आता मलाही ती तेच सांगत आहे”, असं रोशनी म्हणाली. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनीनं खेळकर वृत्ती दाखवत आईबद्दल म्हटलं की, माझ्या आईनं मला नेहमीच जीवनाचा आनंद घेण्यास सांगितलं. आई म्हणाली, तू रात्री पार्टीसाठी जाऊ शकतेस, बाहेर जा आणि मजा कर. कधी पार्टीवरून आले तर आई म्हणायची आज ड्रिंक्स घेतली नाही का, असंही रोशनीनं हसत हसत सांगितलं. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनीच्या या मुलाखतीनंतर तिच्या आईबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मध्यम वर्गीय विचार न करता आपल्या मुलीला मुक्तहस्तपणे जगण्याची मुभा दिल्याबद्दल अनेकजण तिच्या आईचं कौतुक करत आहेत. काही नेटीझन्सनी रोशनी वालियाच्या आईला मॉडर्न मम्मी, मोकळ्या मनाची महिला, स्वातंत्र्याचे खरेखुरे उदाहरण अशा उपमा दिल्या आहेत. (Photo – Roshni Walia Instagram)
-
रोशनी वालिया सन ऑफ सरदार २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. वयाच्या सातव्या वर्षी तिने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. (Photo – Roshni Walia Instagram)
-
२० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे रोशनीचा जन्म झाला. लहानपणीच आई-वडील वेगळे झाले होते. आई स्वीटी वालिया यांनी नंतर मुबंईत येऊन तिला वाढवले. (Photo – Roshni Walia Instagram)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…