-
ब्रेकिंग पॉइंट– जेव्हा सगळं थांबतं अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आपल्या संघर्षाचा आठवणीने उलगडा केला. “शाळा, खेळ, मॉडेलिंग व मग अभिनय सतत पुढेच जात होते. पण २०१४ मध्ये अचानक बेशुद्ध पडले. तेव्हाच समजलं की मी नैराश्याशी झुंजते आहे”, असं ती म्हणते.
-
अदृश्य वेदना “नैराश्य हा एक असा आजार आहे, जो दिसत नाही. समोरचा हसरा वाटतो; पण आतून तो कोसळलेला असतो,” अशी खंत दीपिकाने व्यक्त केली.
-
२०१५ मधील मोठा क्षण २०१५ मध्ये दीपिकाने पहिल्यांदा नैराश्याबाबत उघडपणे सांगितले. बॉलीवूडमधील पहिल्या कलाकारांपैकी ती एक होती, जिने ही भीती नजरेला नजर देत स्वीकारली.
-
आईचा आधार दीपिकाच्या या लढ्यात तिच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली. “आई नसती, तर कदाचित मी यातून बाहेरच पडले नसते,” असे ती वारंवार सांगते.
-
‘Live, Love, Laugh’ची सुरुवात आपल्या अनुभवातून प्रेरणा घेत दीपिकाने Live, Love, Laugh फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती आणि मदत केली जाते.
-
वेदना ते ध्येय एक संदेश, अनेक जीवांकरिता “कोणीतरी एक तरी असा असावा, ज्याला माझ्या शब्दांतून दिलासा मिळेल… तर ते सगळे प्रयत्न सफल झाल्यासारखे वाटते,” असे ती सांगते.
-
शेवटचा संदेश ‘तुम्ही एकटे नाहीत’ दीपिकाचा स्पष्ट संदेश आहे, “नैराश्य हा इतर आजारांसारखाच आहे. मदत घ्या. तुम्ही एकटे नाही.”
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण/इन्स्टाग्राम)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी